
शिवसेनेच्या शिव संचार सेनेच्या वतीने उद्या 9 एप्रिल रोजी संचार समिट 2026 चे आयोजन केले आहे. या समिटमध्ये दळणवळण क्षेत्राबाबत संवाद आणि विचारमंथन होणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची या समिटमध्ये विशेष उपस्थिती असणार आहे.
विलेपार्ले पूर्व येथील डोमेस्टिक विमानतळासमोरील सहारा स्टार हॉटेलमधील वेस्ट ब्लॉक हॉलमध्ये उद्या दुपारी 4 वाजता या समिटला सुरुवात होणार आहे. यावेळी शिव संचार सेनेच्या अधिपृत वेबसाईटचे लोकार्पण केले जाईल. त्यानंतर टेलिका@म, फिनटेक आणि डिजिटल का@मर्स क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींना एकत्र आणत संवाद आणि विचारमंथन होईल, असे शिव संचार सेनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.


























































