
मिंधे गटाच्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू असतानाच ती मध्यावर सोडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घाना दौऱ्यावर निघाले आहेत. 66व्या राष्ट्रकूल परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत घानाला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घ्यायचे आदेश दिलेले असतानाही नार्वेकर या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली आहे. नार्वेकर संसदीय लोकशाहीचे रक्षण आणि संवर्धन यासाठी आयोजित या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. लोकशाहीशी संबंधित या परिषदेत ते कसे सहभागी होणार आणि काय बोलणार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
The decision on Maharashtra’s parliamentary democracy is kept pending and delayed on Speaker Rahul Narvekar’s table (as tribunal).
Done purposely as if to protect an unconstitutional govt that was forced on to Maharashtra, a year ago!
Ironically, speaker Rahul Narvekar, he is…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 29, 2023
”सभापती राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या लोकशाहीचा निर्णय प्रलंबित ठेवत त्याला उशीर करत आहेत. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रावर जबरदस्ती केलेल्या घटनाबाह्य सरकारला संरक्षण देण्यासाठी मुद्दामून ते असं करत आहेत. गंमत म्हणजे, अध्यक्ष राहुल नार्वेकर संसदीय लोकशाहीवरील राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी घानाला जात आहेत. विडंबन किंवा विनोद? महाराष्ट्रातील (देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य) लोकशाहीची हत्या होईल असे वागणारे नार्वेकर संसदीय लोकशाहीचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या परिषदेत कशावर बोलणार किंवा कसे सहभागी होणार?, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केली आहे.
























































