बोरिवली, दहिसरमध्ये साथरोग रोखण्यासाठी उपाययोजना करा, शिवसेनेकडून पालिकेला सतर्कतेच्या सूचना

बोरिवली-दहिसर विभागात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया अशा साथीच्या रुग्णांत वाढ होत असल्याने मुंबई महापालिकेने सतर्क होऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना शिष्टमंडळाने भगवती रुग्णालय आणि पालिका वॉर्ड ऑफिस अधिकाऱयांना निवेदन दिले.

पावसाचा मुक्काम वाढल्याने बोरिवली-दहिसर विभागात साथीच्या आजारांची संख्या वाढत आहे. या विभागात असलेले मुंबई महानगरपालिकेचे भगवती रुग्णालय हे एकमेव रुग्णालय असून वाढलेल्या रुग्णालयाचा रुग्णांचा भगवती रुग्णालयावर ताण येत आहे. रुग्णांचे निदान लवकर होत नसल्याने प्रसंगी रुग्ण दगावण्याचा घटना दहिसर विभागात काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत.याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना विभाग क्र. 1च्या वतीने करण्यात आली आहे. उपनेते विनोद घोसाळकर व माजी आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भगवती रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. विरल ठक्कर व आर मध्य विभाग सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी विधानसभा प्रमुख बाळकृष्ण ढमाले, अशोक म्हामुणकर, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, राजू मुल्ला, उपविभागप्रमुख विनायक सामंत, उदय सुर्वे, अमिता सावंत, संघटक तुषार साळुंखे, विधानसभा समन्वयक हेमा तांबट, मानसी म्हातले, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, उत्तम परब, बापूसाहेब गेजगे, गिरीश सावंत, प्रवीण कुवळेकर, अक्षय राऊत, अभिलाष कोंडविलकर, शाखा संघटक दीपाली आवारी, छाया आमरूळे, नंदा वंजारे, सुप्रिया शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.