शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अध्यक्षपदी अनिल देसाई; राजू पाटील, विजय मालणकर, अशोक शेंडे उपाध्यक्ष, निखिल सावंत सरचिटणीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर झाली आहे. ग्राहक संरक्षण कक्षाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी राजू पाटील, विजय मालणकर, अशोक शेंडे यांची तर सरचिटणीसपदी निखिल सावंत यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे-सचिव -राजेश कुचिक, वनिता पटेल, खजिनदार -देविदास माडये, राज्य कार्यकारिणी सदस्य – दत्ताराम (बबन) सकपाळ, सदानंद घोसाळकर, संजय पावले, बाजीराव शेवाळे, अॅड. अभिराज परब, प्रथमेश जगताप, विभागीय कार्यकारिणी सदस्य-मुकुंद सिनगर (अहिल्यानगर जिल्हा), दीपक जगताप (पुणे जिल्हा), कक्ष मध्यवर्ती कार्यालय प्रमुख- विजय पवार, सहकार्यालय प्रमुख-राजेश चव्हाण.