
कोरोना रोखण्यासाठी योगदान देणाऱ्या पोलीस, डॉक्टर, परिचारिका, समाजसेवक, सफाई कर्मचारी यांचा शिवसेना शाखा 54 गोरेगाव पूर्व व शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शिवसेना आमदार, विभाग प्रमुख सुनील प्रभू व नगरसेविका साधना माने यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी वाफ घेण्याचे यंत्र, सेनेटायझर आणि मास्क भेट देण्यात आले. यावेळी सेलो कंपनीचे डायरेओक्टर गणेश परमेश्वरन, विधान सभा समन्वयक प्रवीण माईनकर, युवा सेनेचे अमोल अपरात, दत्ताराम सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख व संस्थापक अजित भोगले, अध्यक्ष प्रसाद कदम यांनी केले होते.
























































