
आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे देशात घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटाच्या काळात गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच शिवसेना पुढे सरसावली आहे. वांद्रे पूर्व विभागातील नागरिकांना योग्य दरात गॅस सिलिंडरचे वितरण करण्यासाठी शिवसेनेतर्फे विभागातील गॅस एजन्सींना पत्र देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या सर्वत्र गॅस सिलिंडर वितरणामध्ये अनियमितता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व विभागातील वैष्णव गॅस एजन्सी व विजय गॅस एजन्सी यांच्या कार्यालयात शिवसेना नेते, विभागप्रमुख, आमदार अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागप्रमुख उदय दळवी यांनी विभागातील गॅस एजन्सींना भेट दिली. सामान्य नागरिकांना योग्य पद्धतीने गॅस सिलिंडरचा वितरण होण्याबाबत एजन्सींना सूचना करीत तसे पत्र देण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी व महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




























































