विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी निघालो आहे- उद्धव ठाकरे

5116

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपराच मानली जाते. वाजतगाजत आणि गुलाल उधळत लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जमले असून जणू शिवसागरच उसळला आहे. ऐन विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात साजरा होत असलेल्या दसरा मेळावामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते .

दसरा मेळाव्याचे Live Updates 

 • उतणार नाही, मातणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही
 • शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे युतीचे काम करावे आणि पवित्र भगवा विधासनभेवर फडकवावा
 • असे शिवसैनिक मिळण्यासाठीही भाग्य लागते
 • सत्ता येते, सत्ता जाते पण सत्ता डोक्यात जायला नको
 • भगव्याची ताकद कमी व्हायला नको, हे भगवे वादळ आहे.
 • विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी निघालो आहे, त्याला जनतेची साथ मिळेल
 • शाळा आणि गावातील अंतर जास्त असल्याने बससेवा सुरू करणार
 • सुदृढ महाराष्ट्र करण्यासाठी एका रुपयात आरोग्य तपासणीची सुविधा द्यावी लागेल
 • शेतकऱ्यांचा प्रश्न शिवसेनेने मार्गी लावले, कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती करणार, सातबारा कोरा करणार
 • जे स्वतः बेरोजगार झाले आहोत, ते बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत आहेत
 • देशात घुसलेल्या बागंलादेशी घुसखोरांना हाकलून लावा, समान नागरी कायदा आणा ही आमची मागणी आहे
 • आता राममंदिराचे बाळासाहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत
 • कलम 370 रद्द करणे हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते, ते पूर्ण झाले
 • सामनाचा अग्रलेखाचा दाखला देत त्यांनी खटला दाखल केला होता, ते सुडाचे राजकारण नव्हते काय
 • 2000 साली यांनी आठ दिवस महाराष्ट्र तापवला होता, तेव्हा जनतेची काय चूक होती
 • 1992-93 साली देशभरात काय झाले हे जनतेला माहिती आहे, त्यावेळी शिवसेना आणि शिवसैनिकांनी मुंबई वाचवली
 • या राज्यात शिवसेना कधीही सुडाचे राजकारण करणार नाही
 • जनतेने आपल्यावर दाखवलेल्या या विश्वासाबाबत आपण जनतेचे आभारी आहोत
 • प्रत्येक निर्णय घेताना शिवसैनिकांना काय वाटेल हाच विचार आपण करतो
 • त्यांच्या कर्मामुळेच अजित पवार यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
 • अजित पवार यांच्या डोळ्यांत पाणी आले, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते, तेव्हा ते काय म्हणाले होते
 • थकून गेलो असे सांगणारे नेते निवडणुकीला उभे आहेत
 • शिवसेना कधीही लाचार झाली नाही की नरमली नाही, शिवसेना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसमोरच नतमस्तक होते
 • कलम 370 आणि राष्ट्रद्रोही कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आपल्याला हवी आहे काय
 • आमची युती निखळ आहे, ध्येय स्पष्ट आहेत म्हणून जनतेने ही युती स्वीकारली
 • उत्तर प्रदेशात झालेली सपा-बसपाची युती जनतेने का फेटाळली
 • लपूनछपून काहीही करणारी शिवसेना नाही, आम्ही मैत्री आणि वैरही उघड उघड करतो
 • शिवधनुष्य ही माझी तलवार आहे, ती मी अन्यायाविरोधात उचलणार आहे
 • माझ्याकडे वाघनख आहेत, त्याने गुदगुल्या करता येत नाही, तो समोरच्याच कोथळा बाहेर काढतो
 • हाजी, हाजी करणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.
 • अटकेपार रोवण्याचा चमत्कार याच भूमीने घडवला आहे.
 • मराठ्यांना आरक्षण दिले, धनगर आणि आदिवासींनाही आरक्षण देणार आहोत.
 • धनगराच्या काठीला तलवारीची धार असली पाहिजे, नाठाणाच्या माथी ही काठी हाणा
 • आपल्या देशावर प्रेम करणारे, मुसलमानही आहेत. तुम्ही देशावर प्रेम करा, मग वादाचा विषयच नाही
 • वडिलांना दिलेल्या वचनासाठी राज्याचा त्याग केलेल्या रामाचा आदर्श देशासमोर असावा
 • आम्ही वचन पाळतो, त्यासाठी आम्हाला राममंदिर हवे आहे.
 • राजकारणासाठी आम्हांला राममंदिर नको आहे, ही जनतेची मागणी आहे.
 • विशेष कायदा करून राममंदिर निर्माण करण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे.
 • राम होते हे सगळ्यांना मान्य आहे, मात्र, ते अयोध्येतच जन्मले होते का याचा वाद सुरू आहे.
 • शिवप्रभूंनी दिलेला भगवा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत.
 • या महिन्यात आज आणि 24 तारखेला अशा दोन विजयादशमी आहेत.
 • उद्धव ठाकरे यांनी जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या
 • गेल्या 53 वर्षांपासून आपण ही पंरपरा पाळत आहेत, समाजकारण आणि राजकारण करत असलेली एकमेव संघटना
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
 • अवदुत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी तयार केलेले शिवसेनेचे गीत ऐकवले
 • अवदुत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सन्मान
 • शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या कार्य अहवालाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याहस्ते प्रकाशन
 • छत्रपती शिवाजी महाराज, प्रबोधनकार ठाकरे,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन
 • उद्धव ठाकरे यांच्या आगमनानंतर कोण आला रे कोण आला या घोषणांनी परिसर दणाणला.
 • वाल्याला वाल्मिकी करण्याची मशीन आमच्याकडे नाही, वाल्मिकी असलेल्यांनाच आम्ही पक्षात घेतो.
 • नव्या पिढीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आदित्य ठाकरे यांनी स्वीकारली आहे.
 • उद्धव ठाकरे यांनी हातात घेतलेला विषय तडीस नेतात
 • शस्त्रपूजनासाठी रवाना
 • शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला ठाकरे कुटुंबीयांनी केले अभिवादन
 • शिवसेनानेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मीताई ठाकरे, तेजस ठाकरे हेदेखील उपस्थित
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतिर्थावर पोहचले
 • आज उद्धव ठाकरे यांच्या मताशी अनेकजण सहमत आहेत.
 • नोटबंदीविरोधात सरकारमध्ये असूनही जनतेसाठी उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला
 • शिवसेनेच्या विजयाची सुरुवात कणकवली आणि कुडाळमधून होईल
 • शिवसेनेकडे सत्ता नसताना आम्ही बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या आणि सत्ताधाऱ्यांनी बेरोजगार निर्माण केले
 • राज्यात प्रबळ विरोध पक्षच नाही, अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती
 • रडणारे नेते निवडणुकीत लढायला उभे आहेत की, गुडघ्यावर बसले आहेत
 • अजित पवारांसारखे कोणी रडते का, नेता कधी रडतो का, ईडीच्या भीतीने त्यांना रडू कोसळले
 • आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत आहे.
 • आपल्याला शिवसेनेला फक्त विजयी करायचे नाही, तर मंत्रालयावर तेजाचा भगवा फडकावया आहे.
 • जातीपातीत विखुरलेल्या महाराष्ट्राला एकत्र करण्याचे काम बाळासाहेबांनी केले आहे.
 • आपल्याला 124 गड जिंकायचे आहेत, बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायचे आहे.
 • सध्या वाकड्यात आणि आकड्यात जायचे नाही, ही उद्धव ठाकरे यांची सूचना आहे
 • अबकी बार 100 पार, ही घोषणाही त्यांनी केली
 • शिवसेना मैत्री आणि शब्द पाळते
 • शिवसेना-भाजप मैत्रीत कोणताही स्वार्थ नाही, आमची मैत्री निखळ आहे
 • पुढच्या विजयादशमी मेळाव्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांच्या बाजूला बसलेला असेल
 • ”पुरे देशे मे शोर है, महाराष्ट्र मे शिवसेना का जोर है”, ही भावना देशभरात आहे
 • शिवसेना हिंदकेसरी आहे, आमच्यापुढे कोणाही टिकले नाही
 • दसरा मेळाव्याला शक्तीप्रदर्शन म्हणणे अयोग्य, शिवसेनेला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही
 • छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
 • खासदार संजय राऊत यांच्या भाषणाला सुरुवात
 • शिवसेनेच्या मंत्र्यापर्यंत पोहचवलेल्या समस्या मार्गी लागल्या आहेत
 • आदेश बांदेकर यांच्या भाषणाला सुरुवात
 • भगव्या झेंड्यावर जनतेचा विश्वास, हा झेंडा कधीही फसवणूक करत नाही
 • महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्हाला विधानसभेवर भगवा फडकवायचाच आहे
 • नितीन बानगुडे पाटील यांच्या भाषणाला सुरुवात
 • दसऱ्या मेळाव्याला सुरुवात, व्यासपीठावर प्रमुख नेते उपस्थित

dasara-melava1

शिवसेना पण तयार! शिवसैनिक पण तयार!

shiv-sena-dussehra-rally1

 • शिवसेना भवन असे उजळले

shiv-sena-dussehra-rally
शिवतीर्थावर तुफान गर्दी (फोटो – सचिन वैद्य)
 • शिवसैनिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते मदत करत आहेत
 • पोलीस आणि प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
 • शिवसैनिक वाजत गाजत, गुलाल उधळत शिवतीर्थावर पोहोचले
 • शिवतीर्थावर शिवसैनिकांचा शिवसागर उसळला
आपली प्रतिक्रिया द्या