आमच्या संघर्षातून राजकीय कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, हाच या पुस्तकाचा हेतू – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदीतील पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत माहिती दिली. तसेच आमच्या संघर्षातून राजकीय कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, हाच या पुस्तकाचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अलाइकली पॅराडाईज हे इंग्रजी आणि नरक में स्वर्ग हे हिंदी या आपल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन मावळणकर हॉलमध्ये होणार आहे. हे पुस्तक मूळ मराठीत असून त्याचे प्रकाशन झालेले आहे. पण दिल्लीत या पुस्तकाचे प्रकाशन होणे गरजेचे होते. आपल्यासारख्या अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचा सरकारने कशाप्रकारे छळ केला आणि ते सर्व सहन करत आम्ही उभे राहिलो, ते जनतेसमोर आले पाहिजे. अरविंद केजरीवाल, संजय सिंह,मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज असे अनेक नेते आहेत. या संघर्षातून राजकीय कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी हे पुस्तक आहे.

या पुस्तक प्रकाशनाला कपुल सिब्बल, अरविंद केजरीवाल, दिग्विजय सिंग, जया बच्चन, डिरेक ओब्रान, संजय शर्मा यासारखे नेते उपस्थित राहणार आहेत.