श्री रामाच्या साक्षीने नगरमध्ये शिवसेनेचा मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
( छाया : राजू खरपुडे )

सामना प्नतिनिधी । नगर

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे रविवारी (दि.२१) नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून शिर्डी व नगर येथे त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता भव्य मंडप व व्यासपीठ उभारणीचे काम सुरु आहे. व्यासपीठावर भव्य श्री रामाची व छत्रपती शिवाजी महाराज यांची ११ फुटी मूर्ती ठेवण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता शिर्डी येथे तर दुपारी १ वाजता नगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलच्या मैदानावर जाहीर मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.