कराडमध्ये राम कदमांच्या निषेधार्थ आंदोलन

सामना ऑनलाईन । कराड

महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेल्या भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात नागरिकांचा राग काही निवळताना दिसत नाही. कराड शहर शिवसेना आणि महिला कार्यकर्त्यांनी शनिवारी चावडी चौकात कदमांविरोधात आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार राम कदम यांच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली.

यावेळी शिवसेना महिला आघाडी सातारा जिल्हा संघटक अनिता जाधव, उपजिल्हा संघटक हेमलता शिंदे, तालुका संघटक शलिनी गुणवंत, विद्या लोहार, त्रिशला पाटील, उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, तालुका प्रमुख शशिकांत हापसे,कराड शहर प्रमुख शशिराज करपे यांच्यासह शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थिती होते.