
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 4 मधील रिक्त असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
महिला विभाग संघटक – अनिता बागवे (विभाग क्र. 4), महिला विधानसभा संघटक – सुनीता इलावडेकर (अंधेरी पूर्व विधानसभा), महिला विधानसभा समन्वयक – वर्षा ठोंबरे (अंधेरी पूर्व विधानसभा), महिला उपविभाग संघटक – आकांक्षा शिंदे (शाखा क्र. 72, 79), मेघा खेडेकर (शाखा क्र. 75, 76), वैशाली दळवी (शाखा क्र. 80, 81), रेश्मा विश्वकर्मा (शाखा क्र. 86, 121), महिला शाखा संघटक – सिंधू लाड (शाखा क्र. 80), मोहिनी धामणे (शाखा क्र. 81).