
देवरुख नगर पंचायतच्या आज जाहीर झालेल्या निकालात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी विजय प्राप्त केला आहे. प्रभाग क्रमांक १२ मधून बाळा कामेरकर, प्रभाग क्रमांक १३ मधून रितिका कदम आणि प्रभाग क्रमांक १५ मधून निधा कापडी, या तीनही विजयी उमेदवारांचे तालुकाप्रमुख नंदादीप बोरुकर यांनी अभिनंदन केले आहे.
विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांनी सांगितले की, देवरुख नगरपंचायतीच्या परिसरात केवळ आमच्याच प्रभागात नव्हे तर, संपूर्ण देवरुखचा विचार करता आम्ही विकास कामाच्या प्रक्रियेत नेहमीच आघाडीवर राहू. तीन प्रभागातील जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करण्यात आम्ही कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वास विजय उमेदवारांनी व्यक्त केला.





























































