पहलगामच्या हल्लेखोरांना पकडून इंडिया गेटवर उभे करा… खात्मा करून पाकिस्तानात फेका; सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेची डरकाळी

हिंदुस्थानी सैन्याचा आम्हाला गर्व आहे. या संकटाच्या काळात आम्ही सगळे एक आहोत, असे नमूद करतानाच पहलगामच्या हल्लेखोरांना जिवंत पकडून इंडिया गेटसमोर उभे करा आणि त्यांचा खात्मा करून मृतदेह पाकिस्तानात फेकून द्या, अशी सडेतोड भूमिका शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली.

‘ऑपरेशन सिंदूर’ तोपर्यंत पूर्ण होणार नाही, जोपर्यंत आमच्या निरपराध भगिनींचे पुंकू पुसणाऱया पहलगाममधील सहा दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही. पहलगाममध्ये हल्ला करणाऱया सहा दहशतवाद्यांची ओळख पटवून सरकारने त्यांना इंडिया गेटसमोर उभे करावे. त्यांचा खात्मा करून मृतदेह पाकिस्तानात फेकून द्यावेत तेव्हाच बदला पूर्ण होईल अशी आक्रमक भूमिका खासदार संजय राऊत यांनी या बैठकीत मांडली.

देशांतर्गत सुरक्षेवर लक्ष द्या

देशाच्या सीमेवर देशाच्या शत्रूंसोबत आपली लढाई सुरू आहे. त्याचवेळी सरकारने देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. पाकिस्तानचे स्लीपर्स सेल आपल्या देशात सक्रिय आहेत. पेंद्रीय गृहखात्याने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी सूचना संजय राऊत यांनी केली.