मुंबादेवी मंदिर येथील पार्किंग इमारतींना शिवसेनेचा विरोध

मुंबादेवी मंदिर येथील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाबाबत तसेच सतरा मजली पार्किंगच्या दोन इमारतींना विरोध दर्शवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी दक्षिण मुंबईत सह्यांची मोहीम राबवण्यात आली. सदरची जागा मुंबादेवी मंदिर न्यास आणि भाविकांसाठी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते-खासदार अरविंद सांवत यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख संतोष शिंदे आणि विभाग संघटक युगंधरा साळेकर यांनी ही सह्यांची मोहीम राबवली. यावेळी दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक व्यापारी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.