छत्रपती संभाजीनगरात झंझावाती मशाल रॅली, आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व… प्रचाराचा श्रीगणेशा

मुंबईसह महाराष्ट्रात फक्त लुटण्याचे काम महायुती सरकार करत आहे. लुटालूट हा या सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे. दुसरं काहीही हे सरकार करत नाही. हे बिल्डरांचं, काँट्रक्टरांचं, वसुलीबाजांचं, हप्तेबाजांचं सरकार आहे. हे जनतेचं सरकार नाही.

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेच्या मशाल रॅलीचा झंझावात पाहायला मिळाला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. या रॅलीला तुफान गर्दी उसळली होती. संपूर्ण शहर भगवेमय झाले होते. धगधगत्या मशालींच्या तेजाने छत्रपती संभाजीनगर उजळून निघाले. या रॅलीने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची दणक्यात सुरुवात झाली आहे.