संजय वसंत कदम यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी

रत्नागिरी (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध पत्रक जारी करत ही माहिती देण्यात आली आहे.