
हिंदुस्थानी सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने ते दाखवून दिले. हिंदुस्थानी सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम! अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. हिंदुस्थानी सैन्याने पाकडय़ांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 मायभगिनींचे कुंकू पुसणाऱया दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला, असे सांगतानाच, पाकिस्तानचे हिंदुस्थानातील ‘स्लीपर्स सेल’ उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.