
शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थावर दरवर्षी प्रमाणे दणक्यात पार पडला. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाची चिंता सर्वांना सतावत होती. मात्र निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी जनतेने ही चिंता भेदून पावसाची पर्वा न करता ऐतिहासिक दसरा मेळाव्याला हजेरी लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पावसाची तमा न बाळगता भर पावसात भिजत भाषण केलं.