
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिह्यातील पदाधिकार्यांच्या नियुत्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा सल्लागार ः अनिल देवतारे (विधानसभा-वर्धा, हिंगणघाट), प्रशांत शहागडकर (विधानसभा-देवळी, आर्वी), जिल्हाप्रमुख ः श्रीकांत मिरापूरकर (विधानसभा-वर्धा, हिंगणघाट), आशीष पांडे (विधानसभा-देवळी, आर्वी).



























































