नाशिकमध्ये शिवसेना, मनसेच्या संयुक्त जनआक्रोश मोर्चाला सुरुवात; मोर्चात संजय राऊत, बाळा नांदगावकर सहभागी

राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाडण्यासाठी शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त जनआक्रोश मोर्चाला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर या मोर्चात सहभागी झाले आहेत.

हा मोर्चा बी. डी. भालेकर मैदानावरून सुरु झाला आहे. गंजमाळ सिग्नल, दूध बाजार, संत गाडगे महाराज पुतळा, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा विराट मोर्चा धडकणार आहे.