कणकवलीत उद्धव ठाकरेंची ऐतिहासिक सभा, वाचा भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

8333

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सतिश सावंत आणि कुडाळ मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे ऐतिहासिक प्रचार सभेत जनतेला मार्गदर्शन केले. वाचा त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • जे उपरे येऊन आपल्या मच्छिमार लोकांच्या पोटावर पाय देत आहेत. जे तुमच्या मुळावर येत आहेत त्यांना हद्दपार केल्याशिवाय मी राहणार नाही – उद्धव ठाकरे
  • मी आज भाजपा विरुद्ध टीका करायला नाही आलो आहे, मी भाजपाच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी आलेलो आहे की ही खुनशी वृत्ती आमच्याकडे नकोच पण आमच्या मित्राकडे सुद्धा नको कारण ही पाठीत वार करणारी औलाद आहे – उद्धव ठाकरे
  • आज सगळ्यात जास्त कोणी खुश असेल तर स्वाभिमान हा शब्द खुश झाला असेल. स्वाभिमान स्वाभिमान म्हणजे वाकवली ती मान आणि तरी म्हणजे स्वाभिमान – उद्धव ठाकरे

पाठीत वार करणारी औलाद मित्रपक्षातही नको! उद्धव ठाकरेंनी डागली तोफ

  • शिवसेनाप्रमुखांनी जे आता आपल्यासमोर उभे राहिले आहेत, त्यांना काढून टाकलं होत, हाकलून दिलं होतं. ते स्वतःहून नव्हते गेले, लाथ घालून हाकलून दिलं होतं – उद्धव ठाकरे
  • मी मैत्रीला आणि दोस्तीला जागणारा माणूस आहे, पण मित्राच्या घरी कोणी चोर, दरोडेखोर घुसत असतील तर त्यांना सांगायला पाहिजे यांना घेऊ नको, बाहेर काढ. म्हणून मी भाजपच्या मित्रांना सावधगिरीचा इशारा द्यायला आलो आहे – उद्धव ठाकरे
  • असाच हा राक्षस आधी शिवसेनेत होता, त्याला काढला. मग काँग्रेसच रूप घेऊन आला त्याला गाढला. स्वतःचा पक्ष घेऊन आला त्याला गाढला. आता शेवटचा अवतार आहे, आता याला गाढल्यानंतर हा पुन्हा उभा राहू शकत नाही, अजिबात राहू शकत नाही – उद्धव ठाकरे

  • दादागिरी करण्याचा कोणी प्रयत्न केला तर ती तोडून मोडून टाकू आम्ही, तेवढी हिंमत आहे आमच्यात – उद्धव ठाकरे
  • ज्या जिल्ह्याचे नाव किल्यावरून दिले आहे, सिंधुदुर्ग! या सिंधुदुर्गावर संपूर्ण माझा पवित्र भगवाच पाहिजे – उद्धव ठाकरे
  • या ही जागेवर भाजपा ने चांगला कार्यकर्ता दिला असता तर त्याच्या प्रचाराला सुद्धा मी इथे आलो असतो – उद्धव ठाकरे
आपली प्रतिक्रिया द्या