उरणमध्ये प्रचंड पावसात उद्धव ठाकरेंची तुफानी सभा

काँग्रेस साफ गळपटली आहे. राष्ट्रवादीवाले सपशेल सपाट झाले आहेत. त्यांना कामच उरलेले नाही. तरीही शरद पवार म्हणतात, हे सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पण लक्षात ठेवा कालही आमचं सरकार होतं.. उद्याही आमचंच सरकार येणार. तुमचे काडय़ा घालण्याचे उद्योग मोडून पडतील, पण सरकार पडणार नाही, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

तलवारी म्यान, तोफा थंडावल्या! भरपावसात प्रचारसभा, बाईक रॅली व प्रचारयात्रांचा धडाका

पावसाचा मारा झेलत, छत्र्यांचा आधार घेत हजारोंचा जनसमुदाय मैदानात एकाच जागी उभा होता. या तुडुंब गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी गर्जना केली की, सोमवारी महाराष्ट्रात पडेल तो फक्त भगव्या मतांचाच पाऊस आणि महायुतीचे 200 पार शिलेदार निवडून येणार म्हणजे येणारच. शनिवार सकाळपासून पाऊस कोसळतोच आहे. या पावसात उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार का, अशी शंका विरोधक व्यक्त करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अंदाज साफ धुळीला मिळवले आणि खणखणीत सभा घेतल्या.

आपली प्रतिक्रिया द्या