शिवसेना, युवासेनेतर्फे गिरगावात शनिवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन, 24 नामांकित कंपन्यांचा सहभाग

शिवसेना-युवासेनातर्फे युवकांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 10 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत गिरगाव चौपाटी विल्सन कॉलेजसमोरील संकीर्तन हॉल येथे हा मेळावा होणार आहे.

युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ आणि शाखा क्र. 217 चे शाखाप्रमुख शशिकांत पवार यांच्या वतीने महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याचे वैशिष्टय़ म्हणजे यात 24 नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. तसेच दहावी किंवा त्याहून कमी शिक्षण असलेल्या, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी 1570 विविध पदांसाठी संधी आहे. तसेच उमेदवारांना नोकरीविषयक मोफत प्रशिक्षण इन्पहसिस आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमार्फत दिले जाणार आहे. अधिकाधिक तरुण-तरुणींनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क – 7977318175, 7045569494.