शिव विधी व न्याय सेनेचे कायदेविषयक शिबीर उत्साहात

शिवसेनाप्रणित शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने आयोजित “हक्कांची ज्योत – कायद्याच्या प्रकाशात – प्रथम ती’’ या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संघटनेचे अध्यक्ष ऍड. नितीश सोनवणे, उपाध्यक्षा ऍड. सुरेखा गायकवाड, ऍड. स्वप्ना कोदे, ऍड. भूषण मेंगडे, ऍड. सुषमा थोरात, ऍड. शबनम शेख, माजी न्यायाधीश सबिया काझा, ऍड. भक्ती दांडेकर, ऍड. दर्शना जोगदनकर, माजी महापौर उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी महापौर श्रद्धा जाधव, उपनेत्या ज्योती ठाकरे, शीतल शेठ- देवरुखकर, सचिव सुप्रदा फातर्पेकर, महिला संघटक रंजना नेवाळकर, हर्षला मोरे यांच्यासह  ऍड. मनोज कोंडेकर, ऍड. सुमीत घाग, ऍड. वर्षा जगताप, ऍड. कोजल कदम, ऍड. मेघा पडवळ, ऍड. विकास गोरडे, ऍड. निलेश मगर, ऍड. रेश्मा ठिकार, ऍड. शीतल मोहिले उपस्थित होते.