‘शिवरायांचा छावा’ येतोय

 

लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी ओळखले जातात. लवकरच ते ‘शिवरायांचा छावा’ चित्रपट घेऊन येत आहेत. या ऐतिहासिक चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. 16 फेब्रुवारी 2024 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम मोठय़ा पडद्यावर साकारायला मिळणं हे माझे परमभाग्यच आहे असे मी मानतो’, या शब्दांत लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी भावना व्यक्त केल्या. चित्रपटात चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि मृणाल कुलकर्णी या कलाकारांच्या भूमिका आहेत.