
सामना प्रतिनिधी । गंगाखेड
गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग १२ सह शहरातील विद्युत वितरण कंपनीच्या अंतर्गत नागरी समस्या बाबत अनेकवेळा नगरसेवांनी निवेदने दिली. तसेच तोंडी सुचना दिल्या तरीही विद्युत वितरण कंपनीस जाग न आल्याने विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात. शिवसेना नगरसेवकांनी अमरण आज दि.१२ रोजी उपोषणास प्रारंभ केला आहे.
विद्युत कंपनीचा शहरात सातत्याने गलथान कारभारामुळे नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणुन शिवसेना नगरसेवकांनी प्रभागातील नागरी समस्याबाबत गेले. या ६ महिन्यापासून लेखी व तोंडी सुचना करुनही वितरण कंपनीने कोणत्याही समस्या न सोडविल्यामुळे नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे बाळासाहेब राखे व तुकाराम तांदळे यांनी प्रभाग १२ मधील विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यामध्ये प्रभागातील विद्युत तारा लोंबळत असल्यामुळे नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने तात्काळ दूरुस्ती करण्यात यावी, अनेक ठिकाणी विद्युत पोल उभारण्यात यावेत, रस्त्याच्या मध्ये विद्युत पोल असल्याने वहातुकीस व नागरिकांच्या रहदारीस त्रास होत असल्याने पोल काढण्यात यावेत, प्रभागातील अनेक डिपीला दरवाजा नसल्याने नागरीकाच्या जीवितास धोका निर्माण होत आहे, पोल डिपीवरील नवीन किटकॅट बसविणे अदिसह शहरात वीज वितरण कंपनीचे महिनेवारी बिले रिडींग न घेता अव्वाच्या सव्वा येत असून ती वेळेवर येत नाहीत विज. वितरण कंपनीच्या प्रभाग समस्या असून त्याची तात्काळ सोडविण्यात याव्यात आदी मागण्यासाठी शिवसेना नगरसेवक तुकाराम तांदळे उपोषणास बसले आहेत. या उपोषणास प्रभागातील नागरीकासह सखुबाई लटपटे, दिपक मुरकुटे, महेश साळापुरकर, संदिप राठोड, लिंबाजी घोबाळे यांनी उपोषणास भेटी देऊन पाठींबा दिला.
आतातरी वीज वितरण कंपनीस जाग येईल का?
प्रभागात गेल्या अनेक महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या बाबत येथील नगरसेवकांनी वेळोवेळी लेखी आणि तोंडी निवेदने दिली. मात्र अधिकाऱ्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे जोपर्यंत समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरुच राहिल, असा इशारा देण्यात आला आहे.
एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर आज रास्तारोको
गंगाखेड : शिवसेना नगरसेवकांच्या वतीने चालू असलेले उपोषणातील नागरिकांच्या मागण्या संदर्भात महावितरण कंपनीने तात्काळ काम सुरु करावे, अन्यथा उद्या बुधवार, १३ जुन रोजी महावितरणच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने रास्तारोको करुन टाळे ठोकणार, असा इशारा सहाय्यक अभियंता एस. सोनवणे व शहराभियंता पी.एस. डोणे यांना शिवसेना तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी उपोषणस्थळी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.





























































