शिवसेनेच्या वतीने अंबड येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र

515

परतीच्या पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांना चोहोबाजूंनी मेटाकुटीस आणले आहे. जाहीर झालेली मदत अत्यंत तोकडी असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25 हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जालना जिल्ह्यातील अंबड तालुका शिवसेनेच्या वतीने आज 19 नोव्हेंबर रोजी तहसीलदार अंबड यांना देण्यात आले आहे.

तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन माजी आमदार संतोष सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयात महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन कुणीही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना माजी आमदार सांबरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कृषी अधिकारी यांनी पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन विमाधारकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषि कार्यालयातील कर्मचारी सोबत घेऊन करावे व विमाधारक शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळवून द्यावी असे सांगितले.

याप्रसंगी माजी आमदार संतोष सांबरे यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे, तालुकाप्रमुख अशोक बरडे, तालुका संघटक दिनेश काकडे, उपतालुकाप्रमुख विजय सोमाणी, सिद्धेश्वर उबाळे, किसानसेना तालुकासंघटक गोवर्धन उगले, विभागप्रमुख गजानन सानप, प्रल्हाद जाधव, उद्धव उगले, उपशहरप्रमुख शिवराम भोजने यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या