Lok Sabha 2019 मालवणात शिवसेना-भाजप युतीचा झंझावाती प्रचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण शहर व तालुक्यात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. प्रत्येक विभागात झालेल्या सभांनंतर घरोघर प्रचारावर भर देण्यात आला आहे. भगव्या टोप्या, भगव्या शाली गळ्यात घालून प्रचार करणाऱ्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमुळे मालवणात सर्वत्र भगवे वातावरण दिसून येत आहे.

प्रचाराच्या निमित्ताने बुधवारी सायंकाळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार मालवणात आले होते. ते म्हणाले सर्वत्र जनतेचा मिळणारा पाठिंबा लक्षात घेता खासदार विनायक राऊत यांची वाटचाल मोठ्या मताधिक्याकडे सुरू आहे. किमान 5 लाख मते मिळवत खासदार राऊत अडीज लाखाच्या मताधिक्याने निश्चित विजयी होतील. असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला.

मालवण तालुक्यात शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हापरिषद सदस्य हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख प्रमुख बबन शिंदे, यांच्यासह नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, आरोग्य सभापती पंकज सादये, नगरसेविका सेजल परब यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, उपनगराध्यक्ष राजू वराडकर, बांधकाम सभापती गणेश कुशे, नगरसेवक आप्पा लुडबे व अन्य लोकप्रतिनिधी प्रचारात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले आहेत.