
सामना प्रतिनिधी । वसई
महायुतीचे शिवसेना उमेदवार राजेंद्र गावीत यांनी वसई व परिसरातील विविध कार्यक्रमांसह अर्नाळा गाव व किल्ल्याला दिली भेट. वसईत भाजप शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला, यानंतर ख्रिस्ती युवक संघटनेची भेट घेऊन संवाद साधला, पापडी येथिल इस्कॉनच्या रथ याञेत ही सहभाग घेतला, ख्रिस्ती मशनरीस भेट दिली.
अर्नाळा किल्ल्यावर (गावाला) १६ वर्षापूर्वी राम नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून ७ एप्रिल या दिवशी वीज जोडणी मिळाली होती. हा दिवस संपूर्ण गावकरी दिवाळी दसऱ्याच्या सणा प्रमाणे मोठ्या उत्साहात प्रकाश दिन हा सण म्हणूनच साजरा करतात. गावकऱ्यांच्या विशेष आग्रहा वरुन गावीत या उत्सवात सहभागी झाले. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत करत मिरवणूक ही काढली. जवळपास १५० हून अधिक महिला व कॉलेजच्या मुली असे ५०० हून अधिक गावकर्यांनी गावीतांचे जंगी स्वागत केले. या सोहळ्यास हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.
























































