शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरमध्ये महाआरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगर शहरासह जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. नगर शहरामध्ये शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरामध्ये शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली.

नगरचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, महापौर रोहिणी शेंडगे, आमदार शंकर गडाख, शहर प्रमुख संभाजी कदम, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौदर, युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड, माजी महापौर सुरेखा कदम, अभिषेक कळमकर, महिला आघाडीच्या आशाताई निंबाळकर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नगर शहराचा जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून नगर शहर शिवसेनेच्या वतीने येथील विशाल गणपती मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. उद्धवसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असे म्हणत शिवसैनिकांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, गणेश कवडे, संतोष गेनप्पा, संजय शेंडगे, राम नळकांडे, बाळासाहेब बोराटे, माजी महापौर सुजाता कदम, परेश लोखंडे, दत्ता कावरे, दत्ता जाधव, अशोक बडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, जेम्स आल्हाट, अशोक दहिफळे सोपान कारखिले, पहिल्या आघाडीच्या अरुणा गोयल सुषमा पडोळे लता पठारे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.