
सामना प्रतिनिधी, पणजी
महाराष्ट्रात भाजपसोबत युती असली तरी गोव्यात मात्र शिवसेना स्वबळावर लोकसभा लढणार आहे. शिवसेनेतर्फे आज जितेश कामत आणि राखी प्रभुदेसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत उत्तर गोव्यातून आणि उपराज्यप्रमुख राखी प्रभुदेसाई-नाईक या दक्षिण गोव्यातून निवडणूक लढवतील, अशी माहिती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोवा विधानसभेच्या तीन जागांची पोटनिवडणूकही होत असून मांद्रे येथे शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असेल. उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर करू, असेही राऊत यांनी सांगितले.
गोव्यातील कुठलाच स्थानिक पक्ष भाजपशी युती करण्यास उत्सुक नाही तर पारंपरिक मित्रपक्ष महाराष्ट्र गोमांतक पक्षही भाजपवर नाराज आहे. त्यामुळे भाजपची गोव्यातील वाट खडतर असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
23 एप्रिलला येथे मतदान होणार आहे.




























































