महिला अत्याचार प्रकरणात 21 दिवसांच्या आत शिक्षा व्हावी; शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा गुन्हेगारांना रोखण्यासाठी गुन्ह्यांचा तपास सात दिवसांत पूर्ण करून 14 दिवसांत कोर्टात सुनावणी झाल्यानंतर त्यांना 21 दिवसांच्या आत शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. तसेच अल्पवयीन मुलांमध्ये अमली पदार्थांची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. तरुण पिढी ही मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्यांच्यासाठी अद्ययावत नशामुक्ती व पुनर्वसन केंद्र उभारण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.