
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मधील 60 रिक्षा व्यावसायिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप सोमवारी शिवसेना शाखा कुडाळ येथे करण्यात आले. यामध्ये तेल, तूर डाळ, वाटाणे, कांदे, बटाटे, साखर, चहा पावडर या साहित्याचा समावेश आहे. याबद्दल रिक्षा व्यावसायिकांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लोकडाऊन करण्यात आले आहे. सर्वांना याचा फटका बसत आहे. केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरु असून रिक्षा व्यवसाय बंद आहे. या रिक्षा व्यावसायिकांच्या मदतीला आमदार वैभव नाईक धावून गेले असून कुडाळ मधील 60 रिक्षा व्यावसायिकांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप केले आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, संजय भोगटे, संतोष शिरसाट, सचिन काळप, सुशील चिंदरकर, बाळा वेंगुर्लेकर, राजू जांभेकर, राजू गवंडे, नितीन सावंत, योगेश धुरी, कृष्णा तेली, अनुप चेंदवणकर, बाळा पावसकर, रिक्षा संघटनेचे किरण शिंदे, भगवान राणे, संदीप कुंभार, विष्णू दळवी, नामदेव दळवी व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.




























































