
पुरामुळे कोल्हापूर आणि परिसरातील अनेकांचे संसार पाण्याखाली गेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना विभाग क्रमांक 2 च्यावतीने येथील सहा हजार विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील पन्हाळा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, कागल, आजरा आणि राधानगरी क्षेत्रातील सहा हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दप्तर, लेखन साहित्य कीट, 6 वह्यांचे वाटप केले आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, स्थानिक आमदार प्रकाश आबीटकर, सत्यजित पाटील, विधानसभा संघटक संतोष राणे, नंदू मोरे, संतोष धनावडे, उपविभागप्रमुख प्रकाश म्हांद्दाळकर, शंकर हुंडरे, रवींद्र वेदपाठक, कोल्हापूर युवासेना अधिकारी हर्षल सुर्वे, शाखाप्रमुख मनोज मोहिते, युवासेना अधिकारी सिद्धेश फडतरे यांच्यासह युवासेना पदाधिकाऱयांनी ग्रामीण भागांतील शाळांना भेट देऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.






























































