आगामी निवडणुकांमध्ये भगवा डौलाने फडकवणार! कांदिवलीत शिवसेनेचा लक्ष्य-2019 निर्धार मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भगवा डौलाने फडकवणार असा ठाम निर्धार 27 जानेवारी रोजी कांदिवलीच्या चारकोपमध्ये भरलेल्या भव्य निर्धार मेळाव्यात करण्यात आला. शिवसेना विभाग क्रमांक -2मध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसैनिकांच्या प्रचंड प्रतिसादात हा मेळावा पार पडला.

विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षमय परिस्थितीत शिवसेना ही संघटना उभारली. ही संघटना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे अतिशय समर्थपणे पुढे नेत असल्याचे शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत म्हणाले. विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांनी युती असो किंवा नसो आमचे शिवसैनिक म्हणून पक्षासाठी आपले काय कर्तव्य आहे याबाबतची जाणीव करून दिली.

मेळावा यशस्वी करण्यासाठी विधानसभा संघटक संतोष राणे, उपविभागप्रमुख विजय भोसले, राजु खान, महिला उपविभाग संघटक अपर्णा मोहीते, आकांक्षा नागम आणि शाखाप्रमुख मनोज मोहीते, शाम मोरे, निखिल गुडेकर, राजेंद्र निकम आणि सर्व महिला शाखा संघटक यांनी परिश्रम घेतले.