
सामना ऑनलाईन,इस्लामाबाद
हिंदुस्थानी सरकारने कश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर ‘महाभारत’चा बुलंद नारा शिवसेनेने दिला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत तडाखेबंद भाषण करत आता बलुचिस्तानही ताब्यात घेऊ असे बजावले. त्याचे बॅनर्स 2 दिवसांपूर्वी इस्लामाबादेतील रस्त्यारस्त्यांवर झळकले आणि पाकिस्तान हैराण झाले. पाकडे अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. आता त्यांनी त्या बॅनरमधील ग्रामर मिस्टेकवर बोट ठेवत अटक केलेल्या आरोपींचा हिंदुस्थानचा उदो उदो करण्याचा हेतू नव्हता असा कांगावा केला आहे.
या बॅनरप्रकरणी इस्लामाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी चौकशीचे आदेश दिले होते. याच रस्त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचेही कार्यालय आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या बॅनर्सचा जगभरात गवगवा झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी तीन युवकांना अटक केली होती.
पोलीस आयुक्त हमजा शफकात यांनी चौकशीबाबत ट्विट केले असून ते म्हणतात, चौकशी पूर्ण झाली आहे. सर्व आरोपींना अटक झाली आहे. आरोपींच्या जबाबानुसार बॅनरमधील घोळ हा डिझायनरची तांत्रिक चूक आहे. हिंदुस्थानची भूमिका किती राक्षसी आहे हे या अटकेतील तीन आरोपींना दाखवायचे होते, पण त्यांच्या अशिक्षितपणामुळे त्यांनी चुकीचे लिहिले असा पोकळ दावा आयुक्तांनी केला आहे. या तीनही तरुणांनी त्यांचे ग्रामर सुधारण्याची गरज आहे अशी टिप्पणी करायलाही आयुक्त हमजा विसरलेले नाहीत. बॅनर झळकवण्यासाठी आरोपींनी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेतली नव्हती म्हणून त्यांना अटक केल्याचेही हमजा म्हणतात. दरम्यान, शिवसेनेचे बॅनर झळकल्यानंतर जगभरात त्याची एकच चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेने थेट इस्लामाबादमध्ये जाऊन पाकडय़ांना दणका दिला. आता या प्रकरणामुळे अधिक छीः थू होऊ नये म्हणून पाकडय़ांची पळापळ सुरू झाली आहे.
विमानतळावर हायऍलर्ट; व्हिजिटर्स पास बंद
370 कलम रद्द केल्यानंतर देशभरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरातील 19 विमानतळावर हायऍलर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एअरपोर्ट परिसरात टर्मिनल इमारतीबाहेर निगराणी काढण्यात आली आहे. त्याचबरोवर 10 ते 20 ऑगस्ट या काळात क्हिजिटर्स पास देणे बंद केले आहे. जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्यात आल्यानंतर खबरदारी म्हणून देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यावरून 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने क्हिजिटर गॅलरीकरिता पास देणे बंद करण्याच्या सूचना विमानतळ सुरक्षा एजन्सीने दिल्या आहेत.
टर्मिनल इमारतीबाहेर गस्त
टर्मिनल इमारतीबाहेर आणि सुरक्षा भिंतीच्या आत सशस्त्र्ा जकान गस्त घालण्यात यावी, ऍप्रोच रोडने येणाऱ्या काहनांची तसेच प्रकाशांच्या बॅगची तपासणी करण्यात यावी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे (सीआयएसएफ) जकान तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.




























































