
सामना प्रतिनिधी । मुंबई
१९ जून रोजी शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन अत्यंत दिमाखात साजरा होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या राज्यभरातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे राज्यव्यापी शिबीर गोरेगाव येथील नेस्को संकुलात आयोजित करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेनेचे हे एकदिवसीय शिबीर राज्यातील सर्व पदाधिकारी व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच महानगरपालिका, नगरपालिकांचे नगरसेवक आणि तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शिवसेनेचे नेते, उपनेते, खासदार, आमदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

































































