बीड विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून, शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख खा. चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभांवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून पक्षसंघटनवाढ व विस्तार या धोरणानुसार ‘शाखा उदघाटनांचा झंझावात’ सुरू करत मैंदा (पोखरी) येथे शिवसेना व युवासेनेच्या ४ शाखांचे उदघाटन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते झाले.

नाळवंडी सर्कलमधील मैंदा (पोखरी) हे गाव राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून आजपर्यंत ओळखले जात होते. शिवसेना जिल्हाप्रमुखपदी कुंडलिक खांडेंची निवड झाल्यानंतर या गावातील वातावरण बदलले. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या हस्ते येथे ४ शाखांचे उदघाटन संपन्न झाले. या शाखा उदघाटनसमयी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख खांडे यांनी येत्या काळात बीड विधानसभावर भगवा फडकवण्यासाठी नाळवंडी सर्कल भगवेमय होणे आवश्यक असून लवकरच शाखा उदघाटनासह पक्षप्रवेशाचा धडाकाच येथे सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या शाखाउदघाटनप्रसंगी हभप जानकीराम महाराज, उपजिल्हाप्रमुख भारत जगताप, मा.प.स.सदस्य गणेश वरेकर, युवानेते नितीन धांडे, बंडू भाऊ पिंगळे, सरपंच हनुमान जगताप, प्रा. रणजित आखाडे, बाळासाहेब मस्के, गोरख सिंगन, युवासेना जिल्हा समन्वयक गणेश कोळेकर, युवासेना तालुकाप्रमुख राहुल साळुंके, अर्जुन नलावडे, उपसरपंच रोहिदास गोरे, बाबु करांडे, रतन गुजर, आबा घोडके, पिंपळनेर सर्कल प्रमुख सुदर्शन मोरे, राहुल राऊत, शाखाप्रमुख अंकुश पवार, अशोक सगळे, उपशाखाप्रमुख राजेंद्र राठोड, तात्या घुमरेसह आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.