शिवसेना उपशहर प्रमुख सुनील सिसोदिया यांचे निधन

शहरातील लघु उद्योजक, शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुनील सिसोदिया यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.ते 53 वर्षांचे होते. लाँकडाऊनमध्ये उद्योजक मित्रांना सोबत घेऊन अन्नछत्र चालवून हजारो भुकेलेल्यांना जेवण देणाऱ्या शिवसैनिकाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथील मूळ रहिवासी असलेले सिसोदिया संभाजीनगरला आले. शहरात येवून सिसोदिया यांनी परिश्रमाच्या बळावर उद्योग क्षेत्रात आपली छाप पाडली. उद्योग सांभाळीत असताना शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात हिरारिने सहभाग घेतला. लाँकडाऊन सुरू असतांना उद्योजक मित्रांना सोबत घेवून अन्नछत्र चालवून गोरगरिबांना व भुकेल्यांना जेवण दिले. शिवसेनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप , रक्तदान, गरजूंंना मदत करीत होते. गेल्या 8 ते 10 दिवसापासून ते आजारी होते. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, जावई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या