
‘अच्छे दिन’ चे गाजर दाखवून देशातील जनतेला भूलथापा मारण्याचे एकमेव काम भाजप सरकारने केले आहे. नुसत्या मोठमोठय़ा घोषणा आणि पोकळ आश्वासने द्यायची, प्रत्यक्षात मात्र लोकांच्या हातावर तुरी देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. उज्वला योजनेच्या टूमदार नावाखाली मोफत सिलेंडर दिला आणि शिधापत्रिकेवर मिळणारे रॉकेल बंद केले. परंतु सिलिंडरच्या आवाक्याबाहेरच्या किमतीने सामान्य माणूस पुन्हा चुलीकडे वळवण्याच श्रेय मोदी सरकारला दिले पाहिजे अशी टीका जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केली.

पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून आयोजित ’होऊ द्या चर्चा’ मोहिमेच्या संवाद सभेत ते बोलत होते. देशातील सामान्य माणसाला सरकारच्या नाकर्तेपणामुळे दोन वेळच्या पुरेशा अन्नाला महाग व्हावे लागले आहे. त्यामुळे भाजपावाले किंवा त्यांचे मित्र आपल्याकडे मते मागायला येतील, तेव्हा घरातला सिलेंडर दारात आपटून पहिला याचे काय करणार असा सवाल विचारला पाहिजे असेही मुरलीधर जाधव यावेळी म्हणाले. उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी सरकारच्या बोलघेवडय़ा योजनांचा भांडाफोड करत हे सरकार सामान्य जनतेच नसून फक्त भांडवलदार आणि नोकरशहा यांचे आहे असा हल्लाबोल केला.
उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, विधानसभा संपर्कप्रमुख आनंद भेडसे, तालुकाप्रमुख बाबासो पाटील, उपतालुकाप्रमुख संभाजी जाधव, सर्जेराव पवार, तालुका संघटिका चंद्रभागा चौगुले, दिपक चौगुले, दिपक नीळकंठ, पूनम भोसले, युवासेना जिल्हा अधिकारी स्वप्नील मगदूम, नितीन माने यावेळी उपस्थित होते.
कांजूरमार्ग

कांजूरमार्ग विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक 111 च्यावतीने ’होऊ द्या चर्चा’ मोहिमेत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या योजनांची पोलखोल केली. यावेळी संदीप सावंत, विश्वास तुपे, सचिन चोरमुले, अरविंद नागनुरी, दत्ताराम पालेकर, स्वप्निल सावंत, दीपक कोळंबकर, संदीप कदम, प्रज्ञा आंबेरकर, संजीवनी तुपे, चंद्रकांत राणे, सुशील बोरकर, मनोज गवंडे, मनीषा जाधव, सुमन म्हसकर, मोहिनी दिवेकर, रोहिणी घोरपडे, अलका सुर्वे, भारती कुडकर आदी उपस्थित होते. शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुणे

पुणे जिल्हा समन्वयक रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड विधानसभेतील ‘होऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रभाग 9 मधील सुसगाव, महाळुंगे गाव, सुतारवाडी, चौक, पाषाण चौक तर प्रभाग क्रमांक 13 मधील खिलारेवाडी नंबर 15, बाल मित्र मंडळ पौड फाटा, गणेशनगर येथे मोहिमेला भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पुणे शहरप्रमुख गजानन खरपुडे, कोथरूड विधानसभा संपर्कप्रमुख राम कदम, पृथ्वीराज सुतार, चंद्रकांत मोकाटे, राम थरकुडे, जगदीश दिघे, मयूर भांडे, संतोष तोंडे, महेश सुतार, हेमंत धनवे, अनिल माझीरे, राम बाटुंगे, ज्योती चांदेरे, शिवदूत जानोरकर, बराटे, सुतार, गायकवाड यांनी मेहनत घेतली.
माहीम

महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार अशा विविध प्रश्नांसदर्भात केंद्र सरकारविरोधात जनतेच्या मनातील रोष व्यक्त करण्यासाठी प्रभाग क्रमांक 182 मध्ये आयोजित केलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेला सर्व वयोगटातील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सागर सान्निध्य रहिवासी संघ, साईमंदिर (माहीम सुलुप), मासे मार्पेट (मच्छीमारनगर)मध्ये ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, विधानसभा संघटक राजू पाटणकर, उपविभागप्रमुख अभय तामोरे, शाखाप्रमुख विनय आव्रे, महिला शाखा संघटक शपुंतला मेहेर, शाखा संघटक जोगेश तरे तर काँग्रेसचे मुबारक शाह, किशोर तामोरे, निक्सन आदी उपस्थित होते.
मुलुंड

शिवसेना मुलुंड विधानसभेच्या वतीने केंद्रातील भाजप आणि राज्य सरकारने जारी केलेल्या बोलघेवडय़ा योजनांचा भंडापह्ड करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेला मुलुंडमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. मुलुंड पश्चिममधील विठ्ठलनगर, श्रीरामनगर, गवणीपाडा येथे शिवसेना शाखा क्रमांक 107 च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये सर्वसामान्यांनीही भाग घेतला. यावेळी उपविभाग प्रमुख दिनेश जाधव, उपविभाग संघटक नंदिनी सावंत, माजी नगरसेविका हेमलता सुकाळे, शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार, शाखासंघटक प्रमिला घाणेकर आणि विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

























































