गणेशोत्सवात गिरगावातून कोकणात जाणार एसटी बसेस, चाकरमान्यांना शिवसेनेची सवलतीच्या दरात सेवा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी गिरगाव येथून एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. शिवसेनेचे माजी आमदार अरविंद नेरकर यांच्या प्रयत्नाने मागील 20 वर्षांपासून कोकणवासियांसाठी गणेशोत्सवानिमित्त सवलतीच्या दरात एसटी बसेस सोडल्या जातात. यंदाही चाकरमान्यांना सवलतीच्या दरात या एसटी प्रवास करता येणार आहे.

गिरगाव येथून रत्नागिरी, सावंतवाडी आणि गुहागर या मार्गांवर 2×2 आसनाच्या एसटी बसेस कोकणवासियांसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. तिकिटांचे आगाऊ आरक्षण शनिवार 5 जुलैपासून शिवसेना डॉ. भडकमकर मार्ग शाखा, वि.प. मार्ग, इंपिरीयल सिनेमाजवळ, अयोध्या हॉटेलजवळ, मुंबई-7 येथे सायंकाळी 5 ते 7 या वेळेत उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त अरविंद नेरकर – 9821126833 व यशराज नेरकर – 9820626263 यांच्याशी संपर्क साधता येईल, असे आयोजकांनी कळवले आहे.