Mumbai News : रेल्वे स्थानकावर धक्कादायक प्रकार, अश्लील चाळे करत तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न

आसनगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. आसनगाव रेल्वे स्थानकावर नर्सची छेडछाड केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. स्थानकावरच नर्सला पाहून नराधमाने अश्लिल चाळे करत नर्ससोबत लगड करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

निलेश अरुण गायकवाड असे त्या नराधमाचे नाव आहे. ही आसनगाव येथून ती टिटवाळ्याला जात होती. आसनगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 2 वर ती ट्रेनची वाट पाहत होती. टिटवाळ्याला एका खासगी रुग्णालयात ती नर्स असून तिची नाईट शिफ्ट होती. त्या दरम्यान नराधमाने अश्लिल चाळे करत तिच्या लगड येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती प्रचंड घाबरली आणि तिने तत्काळ लोहमार्ग पोलिसांना संपर्क केला. लोहमार्ग पोलीस तत्काळ तिच्या मदतीलला धावल्याने तिची सुटका झाली.