
कॉमेडियन कपिल शर्मा याने कॅनडामध्ये सुरू केलेल्या ‘कॅप्स कॅफे’वर बुधवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला. सरे भागात असलेल्या या कॅफेवर हल्लेखोरांनी गोळय़ांचा वर्षाव केला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. स्थानिक पोलिसांनी या गोळीबाराची चौकशी सुरू केली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेच्या कार्यकर्त्याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. निहंग सिंग्सच्या पोशाखाबद्दल कपिल शर्माने केलेल्या वक्तव्याच्या रागातून त्याने हा हल्ला केल्याचे समजते. कपिल शर्माने अद्याप या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही.