
सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. मागील आठवडय़ात शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्ली होती. ती आज कायम दिसली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 824 अंकांनी घसरून 75,366 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 263 अंकांनी घसरून 22,829 अंकांवर बंद झाला. बीएसईवर लिस्टेड पंपन्यांचे बाजार मूल्य 9.43 कोटी रुपयांनी कमी होऊन 410.08 लाख कोटींवर आले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांचे एका झटक्यात 8 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष आता पेंद्रीय अर्थसंकल्प 2025 कडे लागले आहे.
कपडे–बुटांसाठी खरेदी केला 3बीएचके फ्लॅट
अभिनेता गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने आपले कपडे आणि बूट ठेवण्यासाठी 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट केवळ कपडे आणि बुटांसाठी खरेदी केल्याचा दावा कृष्णाने एका कार्यक्रमात केला. दर सहा महिन्यांनी घरातील कपडे आणि बुटाचे कलेक्शन अपडेट करत असल्याचेही त्याचे म्हणणे आहे.
श्रीराम कृष्णन अमेरिकेत एआय सल्लागारपदी
हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन उद्योजक श्रीराम कृष्णन यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी एआय वरिष्ठ सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. श्रीराम हे व्हाईट हाऊसचे एआय आणि क्रिप्टो झार डेव्हिड सॅक्स यांच्यासोबत काम करणार आहेत. ट्रम्प प्रशासनासाठी कृतिम बुद्धिमता धोरण तयार करणे आणि समन्वय साधणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल.
ये जवानी है दिवानी… 11 वर्षांनंतरही रेकॉर्ड
अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा 11 वर्षांपूर्वीचा सिनेमा अलीकडे पुन्हा प्रदर्शित झाला. इतक्या वर्षांनंतरही या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2013 मध्ये ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमाने वर्ल्डवाईड
बॉक्स ऑफिसवर 318 कोटींची कमाई केली होती. 11 वर्षांनंतर या सिनेमाने 25 कोटी कमावले आहेत.
गुजरातमधील मिस्त्रीला 1.96 कोटींची नोटीस
अहमदाबाद येथे राहणाऱ्या एका मिस्त्रीला बंगळुरू जीएसटी विभागाने 1.96 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस पाठवली आहे. हा मिस्त्री केवळ महिन्याला 16 ते 17 हजार रुपये कमवतोय. जीएसटी विभागाने पाठवलेल्या नोटीसमुळे या मिस्त्रीचे धाबे दणाणले आहेत. सुनील सथवारा हा एक साधारण मिस्त्री आहे. छोटे-मोठे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.