अशिक्षित तरुणींकडून शिका, लिव्ह इन रिलेशनशिपपासून लांब राहा!! केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रद्धा वालकर हत्याकांडाने देशभर खळबळ उडाली आहे, अशातच केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी वादग्रस्त विधान केल्याने ते चर्चेत आले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहेत. सुशिक्षित मुलींनी अशिक्षित मुलींकडून शिकावे की लिव्ह इनपासून लांबच राहायला हवे. याचबरोबर शिक्षित मुली त्यांच्या पालकांना लिव्ह-इनसाठी सोडतात. त्यामुळे गुन्हेगारी वाढते. कोणीही लिव्ह इनमध्ये राहू नये असा सल्ला दिला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर चौधरी आज बिहारच्या गया येथे महान विरांगना उदा देवी यांच्या श्रद्धांजली सभेत भाग घेतला.

मंत्री कौशल किशोर यांनी सल्ला देताना सांगितले की मुलींनी लिव्ह इ ऐवजी कोर्टात जाऊन लग्न करायला हवे. त्यांनी सांगितले की ही मुलींचीही जबाबदारी आहे, कारण त्या आपल्या आई-वडिलांना सोडून देतात. ज्यांनी आयुष्यभर त्यांचे पालनपोषण केले. जर एखादा मुलगा तुम्हाला आवडतो आणि तुम्हाला त्याच्या सोबत राहायचे आहे. मग लिव्ह इनमध्ये का राहता? जर त्यांना मुलगा आवडत असेल आणि त्याच्यासोबत राहायचे असेल तर त्यासाठी योग्य कागदपत्रे तयार केली पाहिजेत. जर आई-वडिल सार्वजनिक रित्या लिव्ह इनच्या नात्यासाठी तयार नसतील तर आपल्याला कोर्टात लग्न करावे आणि मग एकत्र राहायला हवे.

केंद्रिय मंत्री कौशल किशोर यांनी श्रद्धा वालकर हत्याकांडचा उल्लेख करत सांगितले की, अशा घटना त्या सर्व मुलींसोबत घडत आहेत ज्या सुशिक्षित आहेत आणि त्यांना वाटतं त्या फार स्वतंत्र विचारांच्या आहेत. आपल्या भविष्याबाबत निर्णय घेण्याची क्षमता राखतात. अशा मुली लिव्ह इनमध्ये फसतात. मुलींना लक्षात घ्यायला हवे की त्या अशा का करतात. शिकलेल्या मुली जबाबदार आहेत, कारण आई-वडिल अशा प्रकारच्या नात्याला नाकारतात. त्यामुळे शिकलेल्या मुलींना अशा नात्यात नाही राहिले पाहिजे.

कौशल किशोरने केलेल्या वक्तव्यानुळे शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या खासदार चतुर्वेदी यांनी ट्विट करून किशोर यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विनंती पंतप्रधानांना केली.