श्रावण महोत्सव, सुगरणींच्या तुडुंब गर्दीत रंगली दादरची फेरी

470

‘उत्सव पाककलेचा…. उत्सव खाद्यसंस्कृतीचा’ अशी ओळख असलेल्या श्रावण महोत्सवाची अखेरची प्राथमिक फेरी आज दादर केंद्रावर वनिता समाज सभागृहात पार पडली. या फेरीत 100 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. पराठे, थेपल्याचा खमंग दरवळ, स्पर्धकांवर लकी ड्रॉचा वर्षाव, विविध गेम, प्रश्नमंजुषा अशा उत्साहात ही फेरी रंगली. दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.

उत्तरा मोने यांच्या ‘मिती क्रिएशन्स’ या संस्थेतर्फे 1 ऑगस्टपासून सुरू झालेला श्रावण महोत्सव अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. एकूण 11 केंद्रांवर प्राथमिक फेरी घेण्यात आली. कल्पकता वापरून पौष्टिकता जपत तयार केलेले विविध्यपूर्ण पराठे किंवा थेपले (गोड किंवा तिखट) हा प्राथमिक फेरीचा विषय होता. शेफ तुषार प्रीती देशमुख, न्यूट्रीशनिस्ट नमिता नानल, उत्तरा मोने स्पर्धेचे मुख्य परीक्षक होते. स्पर्धकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पितांबरी, तन्वी हर्बल्स, व्हॉयला फॅशन ज्वेलरी, विको, एनकेजीएसबी बँक, आस्वाद, फॅमिली स्टोअर्स, पूर्णब्रह्म, सरोज स्वीटस् या ब्रँडतर्फे गिफ्ट हॅम्पर्स, माधवबागतर्फे फ्री कुपन्स, एस्सेल वर्ल्डचे फ्री पासेस अशी बक्षिसे देण्यात आले.

यावेळी दैनिक ‘सामना’चे नॅशनल हेड मार्केट डेव्हलपमेंट दीपक शिंदे, माजी नगरसेविका ज्योती भोसले, केसरी टुर्सच्या सुनीता पाटील, स्मिता सरजोशी, मनीषा मराठे, स्वाती जोशी, विजय कामेरकर, श्रीया जोशी, शुभांगी देवचके, पराग बापट, संगीता ढोले, प्रथमेश वागळे, लता विंझे आदी उपस्थित होते.

स्पेशल चाईल्डचा सहभाग

‘स्पेशल चाईल्ड’चा सहभाग हे दादरच्या फेरीचे वैशिष्टय़ ठरले. वंदना कर्वे यांच्या आव्हान पालक संघाच्या आठ विशेष मुलांनी स्पर्धेत आपली पाककला सादर केली.

दादर केंद्राचे विजेते

सुनंदा सरोदे (शिराळय़ाचा पराठा)

शारदा शितावंत (पिठलं पराठा)

भारती दलाल (मिनी बर्गर पराठा)

योगिता गांधी (मिश्र धान्य रानभाज्या पराठा)

विद्या ताम्हणकर (श्रावणसाज पराठा)

उत्तेजनार्थ

अभिजित सरोदे (गाजर, टोमॅटो, बीट पराठा)

योगिता मोरे (देठाचे सात्त्विक पराठे)

अंकिता वंजारे (अळूचे थेपले)

सुजाता मथुरे (अळुवडी पराठा)

आपली प्रतिक्रिया द्या