Shravan Special – उपवासाचा साधा सोपा पौष्टिक पराठा

श्रावण महिना म्हटल्यावर व्रत वैकल्ये आणि उपवास हे समीकरण पक्कं आहे. उपवासाला रोज काय करावं हा प्रश्न पडतो तेव्हा, काहीतरी नवीन करुन पाहण्याकडे गृहिणींचा कल असतो. म्हणूनच श्रावणातील उपवासाला काय खावं असा प्रश्न पडला असेल तर हा उपवासाचा साधा सोपा पराठा नक्की करुन बघा.

उपवासाचा पराठा

साहित्य
1 – कप राजगिरा पीठ

1- कप मखाना

1/4 टीस्पून हळद पावडर

1/2 टीस्पून काळी मिरी पावडर

1/4 टीस्पून भाजलेले जिरे पावडर

2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली

1/4 टीस्पून मीठ

1/2 टीस्पून तूप

तेल

 

Shravan Special – राजगिरा पीठाची पुरी कशी बनवाल?

कृती

एका पॅनमध्ये तूप गरम करा, मखाना घाला आणि सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. थंड होऊ द्या.

भाजलेले मखाना मिक्सर जारमध्ये ठेवा आणि बारीक वाटून घ्या.

एका भांड्यात उर्वरित सर्व साहित्य (तेल वगळता) आणि मखाना पावडर घाला. चमच्याने चांगले मिसळा, पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. किमान 15 मिनिटे बाजूला ठेवा.

पीठ पुन्हा मळून घ्या आणि लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा.

नंतर हे पीठ गोलाकार पद्धतीने पाणी लावून थापून घ्या.

डोसा पॅन गरम करा, तेल शिंपडा आणि काळजीपूर्वक पराठा घाला.

थोडे तेल/तूप टाका आणि तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा पराठा गरमच सर्व्ह करा.