
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्रीपाद कुलकर्णी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. कुलकर्णी 10 वर्षे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. मात्र, आता ते शिवसेनेत परतले आहेत. ‘मातोश्री’ येथे शिवसेना प्रक्षप्रुमख उध्दव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, महिला आघाडीच्या जिल्हासंघटक डॉ.शोभा बेंजरगे, लातूर विधानसभा संपर्कप्रमुख शामराव पाचंगे, जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, उपजिल्हाप्रमुख अजित उर्फ बालाजी रेड्डी, युवासेनेचे अॅड. राहूल मातोळकर, अॅड. रवी पिचारे, लिंबन महाराज रेशमे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी दिलीप सोनकांबळे, किसन समुद्रे, सोमनाथ झुंजारे, धनंजय भुरके, विशाल कोथींबीरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
























































