अलंकापुरीत स्वामी महाराज मंदिरात श्रींची प्रक्षाळ पूजा, श्रींचे दर्शनास भाविकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आळंदी

नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज संस्थान च्या वतीने प्रथा परंपरांचे पालन करीत मठात श्री सद्गुरु स्वामी महाराज यांचा वार्षिक उत्सव धार्मिक उपक्रमांनी साजरा झाला. सांगतेत श्रींचे संजीवन समाधीची पूजा भाविकांनी प्रक्षाळ पूजेत शुक्रवारी केली. श्री विठ्ठल नामजय घोषात भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली.

श्रींचे वार्षिक उत्सवात रथोत्सव ग्रामप्रदक्षिणा,पालखी मिरवणूक,प्रारंभी विना व कोठी पूजन,अन्नदान श्रींचा पुण्यतिथी उत्सव दिनी अन्नसंतर्पण महाप्रसाद वाटप, ह. भ. प. चक्रांकित महाराज निवास स्थानी श्रींचे मूळपीठ येथे श्रींचे स्वागत पूजा,उत्सवात संगीत गायन,भजन,अष्टपदी गायन,पंचगंगा आणि समुद्रस्नान,कीर्तन,प्रवचन सेवा,अखंड नामस्मरण,श्री गुरु चरित्राचे वाचन,हरीपाठ आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले.

प्रक्षाळपुजे दिनी भाविकांनी श्रींचे समाधी पूजा उत्साहात गर्दी करून केली. यावेळी श्रीची आरती,पूजा,परंपरेने श्रीना पोशाख,सजावट श्रीचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी आणि गांधी परिवार यांनी केली. यावेळी बाळूकाका गोखले उपस्थित होते.
श्रीची प्रक्षाळ पूजा दिनी स्वामी महाराज संजीवन समाधीला जलाभिषेक,लिंबू-पाणी, साखर, दही, दूध, मध,अत्तर,मंत्र पुष्पांजली,श्रीची आरती केली. भाविकांना श्रीचा गाभारा पूजा दर्शनास खुला. यामुळे प्रथा परंपरेने दर्शन महापूजा करण्यास गर्दी झाली. महाप्रसाद वाटप करण्यात आले.