श्री साईबाबा संस्थानला 1 कोटी 2 लाख रुपयांची देणगी

श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविकांकडून सातत्याने श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते. मुंबई येथील एशियन पेंट्सचे प्रवर्तक रुपेन चौकसी यांनी आज श्री साईबाबा संस्थानला 1 कोटी 2 लाख रुपये इतकी देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे अर्पण केली. ही देणगी श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यानंतर रुपेन चौकसी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी चौकसी यांचा सत्कार केला.